USA Calling

USA Calling

Saturday, August 28, 2010

स्वाइन फ्लू चा फैलाव रोखण्यात पुणे महानगर पालिका व राज्य सरकार असफल

पुण्यात दररोज सरासरी २ त्ते ३ लोक हे स्वाइन फ्लू चे बळी ठरत आहेत, आणि हे वर्षभर म्हणजे ऑगस्ट २००९ पासून चालू आहे, जेंव्हा WHO ने h1n1 pandemic सर्व जगासाठी declare केला तेंव्हा या virus चा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असेल असे म्हंटले होते, व झाले हि तसेच परंतु अमेरिका चीन आदि राष्ट्रात मोठ्या प्रमाणात सरकारने प्रत्येक नागरिकाला vaccinate केले, व मोठ्या प्रमाणात होणारी जीवित हानी टाळली. या वर्षी WHO ने h1n1 pandemic period over असे त्यांच्या website वर प्रसिद्ध केले असले तरी अजून इंडिया व new Zealand हि दोन राष्ट्रे affected आहेत असेही सांगितले आहे, WHO नुसार h1n1 virus अजून दोन ते तीन वर्ष वातावरणात राहू शकतो, त्यामुळे h1n1 पूर्णपणे हद्दपार झाला असे म्हणता येणार नाही, अमेरिका चीन सारखे आपल्याकडेही vaccine तयार करण्यात वेळ लागला असला तरी, तयार झालेले vaccine हे पूर्णपणे सुरक्षित आहे, फक्त काही minor side effect वगळता कोणताही मोठा दुष्परिणाम झालेला नाही, जर काही side effect असतील तर ते काही आठवडे किंवा महिन्यात दिसतात असे आढळून आले आहे, महाराष्ट्र सरकार कडे vaccination सुरु का करण्यात येत नाही असे आम्ही जेंव्हा वारंवार विचारणा करतो , तेंव्हा काही technical व केंद्र सरकार कडून तसा आदेश मिळाला नसल्याचे कारण पुडे केले जात आहे, technical reason म्हणजे सरकार अजून शोधताय कि vaccinate केल्यावर जर काही side effect झाले तर त्याची जबाबदारी प्रशासनावर येईल, जर असे असेल तर अश्या vaccine ला सरकारने मग मंजुरीच का दिली, आणि नागरिक तेच vaccine स्वखर्चाने घेतात तर मग सरकारला चालते, दुसरे कारण असे असू शकते कि, सरकार ला vaccination वर सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करायचे नाही, त्यामुळे pandemic create करून नागरिक घाबरून जाऊन स्वताच लसीकरण करून घेतील, तिसरे कारण म्हणजे जर एकूण लोक संखेच्या १/३ जनतेने vaccination केले तर इतर नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अपोआप तयार होते याला हार्ड इम्युनिटी म्हणतात.

सद्या सिरम व कॅडिला या दोन कंपन्यांचे vaccine बाजारात उपलब्ध आहे व अजून तीन कंपन्या vaccine बाजारात आणण्याच्या तयारीत आहे, त्या तीन कंपन्यांना काही तरी vaccination चा share मिळावा म्हणून सुद्धा त्यांचाकडून प्रयत्न चालू असतील.

फ्लू vaccine फ्लू पासून तुमचे आयुष्यभर रक्षण करू शकत नाही, कारण प्रत्येक फ्लू सीजन मध्ये फ्लू virus त्याचा form change करत असतो, त्यामुळे प्रत्येक वर्षी vaccination करणे आवश्यक असते,

मधुकर माझिरे